top of page

अडुळसा

अडुळसा ही वनस्पती बहुगुणी समजली गेली आहे. खोकला, दमा, श्वसन विकार या विकारांत प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग केला जातो. अडुळशाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे ही सर्व औषधांत विविध रोगांवर वापरतात. प्राचीन काळापासून आयुर्वेदात देखील या वनस्पतीचा औषधी संदर्भ आढळतो. या वनस्पतीच्या औषधी प्रक्रियेद्वारे अनेक दुर्धर रोग बरे होऊ शकतात.

Adulsaa

हे आहेत फायदे ... 

⬛ क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे..

⬛ अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. आठवडाभर हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.

⬛ पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.

⬛ ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.
वापरण्याची पद्धत आणि प्रमाण : पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. .

⬛ डोक्यावर अडुळशाच्या पानांचा लेप लावला की, डोकेदुखी पूर्णपणे थांबते. अडुळश्याच्या फुलांना सुकवून त्यांचे चुर्ण तयार करून गुळासोबत खाल्ल्यास आराम मिळेल.

⬛ अडुळशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधली असता जखम भरून येते.

⬛ श्वासावरील विकारात अडुळशाच्या रसात मध आणि पिंपळी यांचे चाटण अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे श्वासांचे विकार बरे होण्यास मदत होते. दम लागणं कमी होते.

⬛ मासिक पाळी अनियमित नसेल तर अडुळसा फायदेशीर ठरतो. त्यासाठी १० ग्राम अडुळसा, मुळा आणि गाजर ६ ग्राम अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. पाणी आटून कमी झाल्यास गॅस बंद करा. थंड करून या काढ्याचं सेवन करा. अंगावरून पांढरे जाणे, अंगावरून पाणी जाणे, पाळीच्या स्त्रावात दुर्गंधी तसेच अतिस्त्राव किंवा कमी स्त्राव, गुठळ्या पडणे. या सर्व विकारात अडुळशा महत्वाचे औषध ठरते. स्त्रीयांचे सर्व प्रकारचे प्रदर अडुळसा बरा करतो.
मुत्राविषयक आजार दूर होतात

⬛ ज्या लोकांना लघवी येण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागतो किंवा सतत लघवी लागते. अशी समस्या उद्भवत असेल त्यांनी कलिंगडाच्या बिया आणि अडुळश्याची पानं वाटून या चुरणाचे सेवन केल्यास समस्या दूर होईल.

⬛ रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास अडुळसा द्यावा. 10 मि. लि. अडुळशाचा रस व तितकीच खडीसाखर घालून द्यावा, रक्त पडण्याचे कमी होते.अडुळशाच्या पानांचा डोक्‍यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते.

⬛ गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांस देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत, त्यास अडुळशाच्या पानांचा व ज्येष्ठमधाचा काढा रोज एक वेळ दिला असता देवी येण्याची भीती कमी होते. तो घेतल्याने देवीपासून भीती कमी रहाते.

⬛ जीर्णज्वर झाला असता अडुळशाचा लेह देतात.

कसा करावा अडुळसा अवलेह ?
एक लिटर अडुळशाचा रस घेऊन त्यात त्याचे चतुर्थांश म्हणजे पाव किलो साखर घालावी व मंदाग्नीवर ठेवावा. रसास चांगली तार आली म्हणजे उतरून खाली ठेवावा. थोडा गार झाल्यावर त्या रसाच्या निमपट म्हणजे रसाचे निम्मे अर्थात् अर्धा लिटर मध व पाव किलो साखरेच्या निम्मे 100 ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरून ठेवावे. आणि मग काही दिवसांनी हा अवलेह मुरू लागतो. तो लेह मुरला म्हणजे औषध म्हणून उपयोगात आणावा.

* आपल्या डॉक्टरांच्या / वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील औषधी वनस्पतींचा वापर करू नये.  

bottom of page