top of page

भारतासाठी धोक्याची घंटा ?; पाकिस्तान ISI प्रमुखांनी घेतली अफगाणी नेत्याची भेट

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांनी अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हेकमत्यार यांची भेट घेतली. हेकमत्यार तालिबानला सरकार स्थापनेसाठी मदत करत असून पाकिस्तानच्या इशाऱ्याचे ते पालन करणारे आहेत. त्यामुळे ही भेट भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

ree

अफगाणिस्तानचे माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हेकमत्यार हे सुरुवातीपासूनच भारतविरोधी आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून त्यांनी भारताविरोधात अनेक विधाने केली आहेत. अफगाणिस्तानमधील भारताची पकड कमकुवत करण्यासाठी हेकमत्यार पाकिस्तानशीही डाव खेळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आयएसआय प्रमुख आणि हेकमत्यार यांनी बैठकीत अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार बनवण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. हेकमत्यार हे तालिबाननंतर अफगाणिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संघटना हिज्ब-ए-इस्लामीचे प्रमुख आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारत, अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या भूमिकेबद्दल दोघांनीही चर्चा केल्याचे वृत्त टोलो न्यूजने दिले आहे.




 
 
 

Comments


bottom of page