top of page

सोलापुरात आज निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

सोलापुरातील रेड़ीमेड कपडे, चादरी, टेरी टॉवेल्स आणि डाळींब,यांच्या निर्यात वाढीसाठी प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सतर्फे बुधवार दि. २० ऑक्टोबर रोजी निर्यातदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालाजी सरोवर हॉटेल येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ree

फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्सने सोलापूर जिल्ह्याची निवड निर्यात क्षेत्र म्हणून केली आहे. सोलापूर जिल्ह्यातून चादरी आणि टॉवेल तसेच तयार कपडे आणि डाळिंबांची निर्यात वाढवता येईल असे या फेडरेशनला लक्षात आले असल्याने या मालाची निर्यात करणार्‍यांसाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील उद्योग वाढीची क्षमता, चादर, टॉवेल, तयार कपडे आणि डाळींब यांच्या निर्यातीला असलेली संधी, निर्यात वाढीत फेडरेशनची भूमिका आणि निर्यात उद्योगाची सुरूवात आणि व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, डाळींब संशोधन केन्द्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, सोलापूर गारमेंट असो.चे संचालक अमितकुमार जैन, डाळींब संशोधन केन्द्राचे संचालक नीलेश गायकवाड आणि मिहीर शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन,सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आदींचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात ऑनलाईन सामील होण्यासाठी https://bit.ly/SOLAPUR लिंकवर क्लिक करावे.

ID -81229504388 व Password - 904690


 
 
 

Comments


bottom of page